श्री स्वामी जगद्गुरू शंकराचार्य विद्याशंकरभारती, पीठ करवीर यांनी वैदिक परंपरा जोपासणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला धर्मपीठाकडून मान्यता मिळावी, त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा उचित गौरव व्हावा, या उद्देशाने श्री आद्य शंकराचार्य वैदिक पुरस्कार देण्यास आरंभ केला. वैदिक क्षेत्राबरोबरच धार्मिक, कला, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरव करण्यास सुरुवात केली.
१. कै. ह. भ. प. नरहरबुवा कऱ्हाडकर पुरस्कार
२. कै. श्रीपाद सीताराम गोसावी पुरस्कार
३. श्री. वसंतराव गोपाळराव नाईक पुरस्कार
४. होतकरू विद्यार्थी पुरस्कार
५. महिला कीर्तनकार पुरस्कार
यासाठी जिल्ह्यातील विद्वानांची निवड करण्यात येते. यासाठी कीर्तन, प्रवचन, व्याख्यानांद्वारे धर्मप्रसार, जनजागृती व समाज-प्रबोधन करणाऱ्यांची, वेदविद्या व याज्ञिकीद्वारे सनातन वैदिक धर्माची परंपरा जपणाऱ्याची तसेच नि:स्वार्थीपणाणे व निरपेक्षपणाने धार्मिक कार्य करणाऱ्यांची निवड करण्यात येते.
महत्वाची टीप:
१. वरील पुरस्कार त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींना एकदाच देता येतात.