वैदिक पुरस्कार

श्री स्वामी जगद्गुरू शंकराचार्य विद्याशंकरभारती, पीठ करवीर यांनी वैदिक परंपरा जोपासणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला धर्मपीठाकडून मान्यता मिळावी, त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा उचित गौरव व्हावा, या उद्देशाने श्री आद्य शंकराचार्य वैदिक पुरस्कार देण्यास आरंभ केला. वैदिक क्षेत्राबरोबरच धार्मिक, कला, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरव करण्यास सुरुवात केली.

या वैदिक पुरस्कारासाठी महाराष्ट्राबाहेरीलही व्यक्तींची निवड करण्यात येते. संस्कृत प्राच्य विद्येचा गाढा व्यासंग, वेदांच्या कोणत्याही शाखेचा अभ्यास व संशोधनात्मक कार्य, तसेच संस्कृत व वैदिक शास्त्री अगर तत्सम अभ्यासक्रमाची सर्वोच्च पदवी प्राप्त केलेल्या नामवंत व्यक्तींची निवड करण्यात येते. पुराणांच्या अभ्यासकांचाही पुरस्कारासाठी विचार करण्यात येतो. २००१ पासूनचा हा वैदिक पुरस्कार कै. मल्लारी विष्णू उर्फ बंडोपंत धर्माधिकारी, यांचे नावे सुरु करण्यात आला आहे.

महत्वाची टीप:

१. वरील पुरस्कार त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींना एकदाच देता येतात.

२. वरील पुरस्काराचे स्वरूप प्रत्येक रु. ५,०००/- (रुपये पाच हजार) मात्र रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, पुष्पहार, शाल, श्रीफळ असे आहे.

Open chat
श्री स्वामी जगद्गुरू शंकराचार्य पीठ, करवीर संदर्भात अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा :
https://shankaracharyakarveer.org/ आपण थेट पीठाच्या खालील पत्त्यावर समक्ष भेट देऊ शकता
पत्ता: श्री स्वामी जगद्गुरू शंकराचार्य पीठ, करवीर – २२९९, “डी”, शुक्रवार पेठ, कोल्हापूर – ४१६ ००२ महाराष्ट्र