नवीन योजना

श्रीमत् जगद्गुरू शंकराचार्य पीठ करवीर मठात चालू असलेल्या कार्याच्या नवीन योजनांचा तपशील

अन्नदान : करवीर निवासिनीच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान (सध्या अल्प प्रमाणात चालू आहे)

दैनंदिन पूजा-अर्चा : दैनंदिन पूजा-अर्चा विधीपूर्वक होत आहे

श्री सप्तशती पाठ : निधीअभावी पाठ होत नाही

विद्यार्थी निवास : इमारत जुनी आहे, तेथे मादी आहे, स्वतंत्र खोल्या नाहीत

भक्त निवास : याकरिता निवीन इमारत बांधणे आवश्यक आहे

वेदाध्ययन : मध्यान्तारीचे काळात बंद पडले होते, ते पुन्हा चालू केले आहे

संदर्भ ग्रंथालय : मठात धर्म, संस्कृती, इतिहास, वैदिक परंपरा, धर्मशास्त्र या विषयावरील अनेक दुर्मिळ ग्रंथ असून त्याचा लाघ अभ्यासकांना, संशोधकांना सतत होत असतो

गो-संरक्षण : मठात गाई व गोशाळा आहेत. निधीअभावी मर्यादित, निधीच्या उपलब्धतेनुसार वाढविण्याचा संकल्प. हिंदू शास्त्रानुसार आपण रोज गोग्रास घालू इच्छितो, परंतु सद्य:स्थितीत व गतिमान युगात गायींची उपलब्धता असतेच असे नाही. यास्तव दररोज आपल्या कुवतीनुसार ५-१० रुपये प्रमाणे बाजूस ठेवून एकत्रित झालेली रक्कम मठाकडे पाठविली तर आपल्या इच्छेनुरूप आपण ठरवून दिलेल्या दिवशी आपले नांवे गोग्रास होईल.

सांस्कृतिक व धार्मिक पुरस्कार वितरण : हल्ली चालू असलेल्या कार्यक्रमास विधायक रूप देणे, याचा खर्च रुपये २,५०,०००/-

यतिभिक्षा-अन्नदान : रोजचा किमान १०० व्यक्तींना प्रसाद. यतिभिक्षा – यतिभिक्षेचे महत्व असे की, एका संन्याशाची भिक्षा म्हणजे १०० ब्राह्मण भोजनाचे पुण्य. यासाठी रुपये ६,०००/- किंवा त्याहून अधिक रक्कम इकडे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवल्यास इच्छित दिवशी आपले मार्फत एखादा यति, संन्याशी, आचार्य यांची यतिभिक्षा होईल. यासाठी १ वर्षाचा एकूण खर्च रुपये १४,६०,०००/- इतके व्याज होणेसाठी त्या प्रमाणात होणारी रक्कम फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवणे आवश्यक.

सप्तशती पाठ : रुपये २,५००/- मठाकडे ठेव म्हणून फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आपल्या इच्छेनुरूप वर्षातून एक दिवस सप्तशती पाठ व देवता नैवेद्य होईल.

सर्व योजनांची पूर्तता करण्यासाठी रुपये ५,००,००,०००/- ची गरज आहे आणि हे सर्व आपल्याच उदार देणगीतून साकारणार आहे. तरी आपणास जेवढे करता येणे शक्य आहे ते ते करून हा भार हलका करण्याचा निश्चय करावा.

टिप : मठात राजेराजवाड्यांनी दिलेले २००० एकराचे उत्पन्न आता फक्त कागदावर आहे. प्रत्यक्ष हातात काही नाही. लोकाश्रयावरच हे सर्व संकल्प अवलंबून आहेत.

श्रीमद्जगद्गुरू आद्य शंकराचार्य यांचे व पीठ देवतेच्या आशीर्वादाने आपणास या कार्यास सहकार्य करणेची प्रेरणा मिळो, हीच इच्छा….

Open chat
श्री स्वामी जगद्गुरू शंकराचार्य पीठ, करवीर संदर्भात अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा :
https://shankaracharyakarveer.org/ आपण थेट पीठाच्या खालील पत्त्यावर समक्ष भेट देऊ शकता
पत्ता: श्री स्वामी जगद्गुरू शंकराचार्य पीठ, करवीर – २२९९, “डी”, शुक्रवार पेठ, कोल्हापूर – ४१६ ००२ महाराष्ट्र